Home आरोग्य कोरोनाच्या रूग्णसंख्येत लक्षणीय घट

कोरोनाच्या रूग्णसंख्येत लक्षणीय घट

0
119


नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात तब्बल ७० दिवसानंतर सर्वाधीक कमी रूग्णांची गत चोवीस तासांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख २१ हजार ३११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर ८४ हजार ३३२ नवीन बाधित आढळून आले. याशिवाय ४ हजार ००२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये बाधितांची संख्या ही मागील ७० दिवसांमधील निच्चांकी संख्या ठरली आहे.

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २,९३,५९,१५५ झाली असून, २,७९,११,३८४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आजपर्यंत देशात ३,६७,०८१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १०,८०,६९० असून, आजपर्यंत २४,९६,००,३०४ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.


Protected Content

Play sound