Home राजकीय मुकुल रॉय यांची घरवापसी ; ममता बनर्जी यांचा भाजपला धक्का

मुकुल रॉय यांची घरवापसी ; ममता बनर्जी यांचा भाजपला धक्का

0
39

कोलकोता, वृत्तसंस्था ।  भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या उपस्थित प्रवेश करून घर वापसी केली  आहे. यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

 

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी,  ”मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तर, मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभवातली, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

 


Protected Content

Play sound