कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल आठ दिवसात येण्याची शक्यता : डॉ. पॉल

नवी दिल्ली,वृत्तसंस्था   ।   केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन  कोवॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निकाल पुढील सात ते आठ दिवसात येण्याची शक्यता  असल्याची माहिती  नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. 

 

भारतीय कोरोना लस  कोवॅक्सिनला  अमेरिकेने त्यांच्या देशात परवानगी नाकारली नाकारल्यानंतर काही तासांतच मोदी सरकारनेही कोवॅक्सिन लशीबाबत ही माहिती दिली आहे. या लसीचे उत्पादन हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून करण्यात येते.  भारतात या लशीला आपात्कालीन वापराला मंजुरी देण्यात आलेली आहे. सध्या कोरोना लसीकरण मोहिमेत ही लस दिली जात आहे. अमेरिकेतही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागण्यात आली होती. भारत बायोटेकने अमेरिकेतील भागीदार ऑक्यूजेन कंपनीच्या माध्यमातून ‘एफडीए’कडे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने मंजुरी मागितली होती. मात्र ‘एफडीए’ने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली नाही. एफडीए’ कोव्हॅक्सिन लशीचं आणखी एकदा परीक्षण करण्यास सांगितलं आहे. यानंतरच अमेरिकेत पूर्ण वापरासाठी मंजुरी मागितली जाईल, असे ऑक्युजेनकडून सांगण्यात आलं आहे

 

Protected Content