जळगाव प्रतिनिधी । फुले मार्केट मधील दुकानातून महिलेच्या गळ्यातून मंगलपोत चोरून नेल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मनिषा भिका पाटील (वय-३४) रा. धानवड ता.जि.जळगाव ह्या पती भिका पुंडलिक पाटील यांच्यासोबत मुलगी भुमिका हिच्यासाठी कपडे घेण्यासाठी आल्या होत्या. सकाळी ११ वाजता सेंट्रल फुले मार्केटमध्ये दाखल झाले. मार्केटमधील प्राची कलेक्शन येथे कपडे घेण्यासाठी दुकानात बसले. त्यावेळी दुकानात गर्दी होती. दरम्यान कपडे आपल्यानंतर ते उठले असता त्यांना त्यांच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समाजले. परिसरात शोधाशोध केली परंतू काहीही उपयोग झाला नाही. मनिषा पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी मनिषा पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस कर्मचारी करीत आहे.