जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे जीन बसविण्याच्या कारणावरून शिक्षकाला सहा जणांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, वसिम अक्रम शेख मुसा कुरेशी (वय-३२) रा. कुरेशी मोहल्ला, नशिराबाद हे शिक्षक म्हणून नोकरीला आहे. बुधवार ४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सार्वजनिक गल्लीत मुनीफ खाटीक हे जीना बसविण्याच्या कारणावरून अक्रम शेख यांच्याशी बाद घातला. या वादात खाटीकसह शरीफ खाटीक, वहीदा मुस्ताक खाटीक, एजाज मुस्ताक खाटीक, नुरजहा शरीफ खाटीक आणि वहिदा मुनाफ खाटीक यांनी वसीम कुरेशी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तर इतरांनी कुरेशी यांच्या हाताला चावा घेवून दगड व विटा फेकून मारले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रूग्णालया उपचार घेवून वसीम कुरेशी यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.