Home धर्म-समाज भुसावळात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने प्लॅस्टिक कॅरीबॅग विरोधी अभियान

भुसावळात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने प्लॅस्टिक कॅरीबॅग विरोधी अभियान

0
39

भुसावळ, प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण  दिनानिमित्त जामनेर रोडवरील भाजी मार्केटजवळ प्लॅस्टिक कॅरीबॅग विरोधी अभियान राबवण्यात आले. 

 

प्लास्टिक कॅरीबॅग, पर्यावरण आणि कोरोना असा संबंध जोडत, शैला सावंत यांनी लोकांशी छान संवाद साधला.  याप्रसंगी उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले.  मा. नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी सादर उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. परिसरातील दुकानांना भेटी देऊन दुकानदारांनी या अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन श्री. ठाकूर यांनी  केले.   राष्ट्रसेवादलाचे युवराज कुरकुरे , श्रीफाऊडेशनचे किरण मिस्तरी, चंद्रकांत चौधरी, विजय निंबाळकर, निलेश फालक, श्री, व सौ बेहरा इत्यादींचा अभियानात सहभाग होता.

 


Protected Content

Play sound