शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत मदत करा : सभापती कोळी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात वादळामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतातील केळीची साफ सफाईसाठी  रोजगार हमी योजनेअतर्गत शेतकन्यांना मदत मिळावी अशी मागणी  पंचायत समिती सभापती कविता कोळी  यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत निवेदनाद्वारे केली. याप्रसंगी  माजी मंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, केळी बागांचे आतोनात नुकसान झालेले आहे. वादळामुळे केळी कोलमोडून पडल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास  वादळाने हिरावून घेतला आहे. झालेल्या सर्व नुकसानाची लवकरात लवकर त्वरीत पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. तसेच वादळामुळे केळी पिकाचे खुप नुकसान झालेले आहे. केळीचे पडलेले खोड उचलणे कामी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांंच्या शेतातील केळीचे  खोड  उचलण्यात यावे जेणे करुन त्यांना आता या कठीण समयी मदत केल्यासारखे होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

Protected Content