Home क्राईम देवगाव येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

देवगाव येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल


चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील देवगाव येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील देवगाव येथील १५ वर्षीय मुलीला ३० मे रोजी सकाळी ११ वाजता मुकेश शिरसाठ (पुर्ण नाव माहिती नाही) रा. धानोरा ता. चोपडा जि.जळगाव या तरूणाने मुलीला फुस लावून पळवून नेले. संशयित आरोपीच्या घरी व नातेवाईकांकडे शोधाशोध करून मुलगी मिळून आली नाही. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुकेश शिरसाठ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जगदीश कोळंबे करीत आहे.


Protected Content

Play sound