Home क्राईम घुसर्डी येथे महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

घुसर्डी येथे महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा


पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील घुसर्डी येथील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकावर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील घुसर्डी येथील ३० वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. गावातील भुषण पतंगराव देवकर हा २४ मे रोजी दुपारी १२ वाजता आणि ३० मे रोजी सकाळी ८ वाजता या दोन्ही वेळा भूषण देवकर हा घरात घुसून महिलेच्या अंगाशी अंगलट केले. तर तिचा फोटा काढून धमकी दिली. आणि अश्लिल हावभाव दाखवून तिचा विनयभंग केला. विवाहितेच्या फिर्यादीवरून भुषण देवकर याच्या विरूध्द पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound