Home आरोग्य शहरतील नियम मोडणारी ७ दुकाने सील (व्हिडिओ)

शहरतील नियम मोडणारी ७ दुकाने सील (व्हिडिओ)

0
39


जळगाव,प्रतिनिधी।  शहरात कोरोना प्रतिबंध नियम मोडणाऱ्या स्टेशन रोड, एमजी रोड, नवी पेठेतील ७  दुकानांना सील लावण्याची कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मागर्दर्शनाखाली करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. मात्र, या आदेशाची पायमल्ली करत काही दुकानदार व्यवसाय करतांना मनपा पथकाला आढळून आले आहेत. यात फुले मार्केट समोरील पोशाख, स्टेशन रोड वरील रसाळ चेंबर्समधील आदिनाथ एंटरप्रायजेस, नवी पेठ मधील शिव कलेक्शन, नटवर मॉल मधील सुशिल वूमन शॉपी व सिल्व्हर ग्लोरी एलएलपी तसेच स्टेशन रोडवरील बॉम्बे हॉटेल यांचा समवेश आहे. ही ७  ही प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. हि कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागातील पी. पी.पुराणिक, समीर बोरोले, अतुल पाटील,जयंत शिरसाठ,   सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित राजपूत, जितेंद्र चव्हाण आदींच्या पथकाने केली. 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/619585362778266

 


Protected Content

Play sound