Home Cities जळगाव जननायक थिएटरतर्फे कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची थाळी वाटप (व्हिडीओ)

जननायक थिएटरतर्फे कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची थाळी वाटप (व्हिडीओ)

0
43


जळगाव प्रतिनिधी । शहरातील जननायक थिएटरतर्फे आरोग्यदूत पितांबर भावसार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रूग्णालयासमोर कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाच्या थाळीचे वाटप करण्यात आले. 

जिल्हा रूग्णालयात कोरोना बाधित रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत. रूग्णाच्या देखरेखीसाठी रूग्णालयाच्या बाहेर थांबलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही माहिती लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा वायफळ खर्च न करता आणि गरजूंना मदत करण्याच्या हेतूने जी.एम. फाऊंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील जननायक थिएटरतर्फे आज बुधवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरिब व गरजूंना मोफत जेवणाची थाळी वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जननायक थिएटरचे अध्यक्ष होनाजी चव्हाण, गौरव लवंगे, कल्पेश बेलदार, जयेश भावसार, गोपाल पाटील, अमोल सोनवणे, कबीर परदेशी, पराग महाशब्दे, शरद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1771075146427241

 


Protected Content

Play sound