चिंचगव्हाण येथे अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचगव्हाण येथे निधीच्या अभावामुळे अंगणवाडीचे बांधकाम रखडले होते. मात्र ८ लाख ५० हजार रुपयांचे निधी प्रत्यक्षात मंजूर झाल्याने अंगणवाडीचे भूमिपूजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले.         

तालुक्यातील चिंचगव्हाण (सुंदर नगर) येथे निधीच्या अभावामुळे अंगणवाडीचे बांधकाम रखडले होते. मात्र खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, अनिल गायकवाड व सुभाष राठोड यांच्या अथक परिश्रमातून ८ लाख ५० हजार रुपयांचे निधी मंजूर झाले आहे. या पाश्र्वभूमीवर चिंचगव्हाण (सुंदर नगर) २४ मे रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून यावेळी भूमिपूजन करण्यात आले. अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ज्ञानाचा प्रकाश घराघरात पोहोचणार असल्याचे प्रतिक्रिया सरपंच अनिता राठोड यांनी व्यक्त केली आहे.

या भूमिपूजनप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड, सुभाष राठोड, नवल पवार, सागर पाटील, प्रदिप देवरे, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच कल्पना चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम निकम, धोंडीराम निकम , नवनाथ राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Protected Content