Home क्राईम अयोध्यानगरातून दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

अयोध्यानगरातून दुचाकी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
116
two wheelar thift


जळगाव प्रतिनिधी । अयोध्यानगरातील राम मंदीराजवळून लॉड्री व्यवसायिकाची २३ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धिक माहिती अशी की, गोपाल मोतीराम महाले (वय-४६) रा. राम मंदीराजवळ अयोध्यानगर जळगाव यांचे हे कपडे इस्त्री करण्याचे काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २३ मे रोजी त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बीझेड ४९३९) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी २३ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही. गोपाल महाले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे. 


Protected Content

Play sound