Home Cities भुसावळ जनतेचे प्रेम आणि साथ मला मिळेलच : रक्षाताई खडसे

जनतेचे प्रेम आणि साथ मला मिळेलच : रक्षाताई खडसे


rakshatai khadse raver loksabha faijpur
 

भुसावळ (प्रतिनिधी) फैजपूर तालुक्यातील आमोदे येथील ग्रामस्थांनी आज मोठ्या उत्साहात भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचे स्वागत केले. आपण माझ्यावर दाखवलेले प्रेम व उबदार माया पाहून मला नेहमीच आनंद मिळतो. यापुढे देखील आपण माझ्यावर असेच प्रेम कराल व मला आपली अशीच साथ लाभेल अशी मी आशा करते, असे रक्षाताई खडसे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

याप्रसंगी आमदार हरीभाऊ जावळे, लोकसभा संयोजक व जिप उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हिराकाका चौधरी, नगराध्यक्षा महानंदाताई होले, माजी सभापती भरत महाजन, माजी नगराध्यक्ष होमराज चौधरी, शहराध्यक्ष संजय रल, यशवंत तळेले, महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound