Home Cities जळगाव संजय वराडे कॉंग्रेसमधून निलंबित

संजय वराडे कॉंग्रेसमधून निलंबित


sanjay warade

जळगाव (प्रतिनिधी) सतत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षहीतास बाधा पोहचत असल्यामुळे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांना कॉंग्रेसने निलंबित केले आहे. जळगाव जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, मागील काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पक्षाचे सरचिटणीस जिजाबराव पाटील यांच्यावर हल्ला देखील झाला होता. हा वाद शांत होत नाही, तोच जळगाव जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांनी माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. सतत पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश कॉंग्रेस कॉंग्रेस तथा जळगाव प्रदेश पदाधिकारी यांच्या मान्यतेने पुढील आदेश येई पर्यंत वराडे यांना निलंबित केले असल्याचे आदेशात म्हटले आहे. या पत्रावर जळगाव जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांची स्वाक्षरी आहे. तर काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिलीय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound