Home Cities भुसावळ डॉ. उल्हास पाटील यांना जमाते इस्लामीचा जाहीर पाठींबा

डॉ. उल्हास पाटील यांना जमाते इस्लामीचा जाहीर पाठींबा

0
41

भुसावळ प्रतिनिधी । रावेर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना जमाते इस्लामी हिंद या संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.

भुसावळ येथे जमाते ईस्लामे हिंद संघटनेच्या जाम मोहल्ला भागातील कार्यालयात डॉ. उल्हास पाटील यांना जाहीर पाठींबा घोषीत करण्यात आला. याबाबतचे पत्र डॉ. पाटील यांना सोपविण्यात आले. या प्रसंगी अब्दुल रऊफ फैजपुर,शरीफ सर, ईलीयास टेलर रावेर, सै अकलाक, सै अशरफ भाई, गफ्फार खान, जुबेर खान भुसावळ, अकील अहेमद, असलम खान यावल, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मो मुनव्वर खान, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र पाटील, युथ काँग्रेसचे भुसावळ अध्यक्ष इम्रान खान तसेच जमाते इस्लामी हिंद संघटनांचे विविध तालुकाध्यक्ष उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound