Home Cities पाचोरा जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा

जीवाची पर्वा न करणारे हेच खरे योद्धा

0
68


पाचोरा, प्रतिनिधी । येथील पोलिस बॉईज असोसीएशनकडून आज दि. १९ रोजी पाचोरा शासकीय रुग्णालयात परद्यामागील खरे हीरो त्यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाचोरा पोलीस बॉईज असोडिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पाचोरा येथील पिता – पुत्र आतिश चांगरे, भैरु चांगरेसह सरीता कतार चांगरे हे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य पध्दतीने पॅकिंग करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीब्द्द्ल पाचोरा पोलिस बॉईज असोसीएशनतर्फे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पाचोरा पोलिस बॉईज असोसिएशनचे तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख व जळगांव जिल्हा सचिव हर्षल हिरालाल पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रफुल पाटील व बंटी पाटील, गौरव चौधरी व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेवक गजानन काकडे सह पोलिस बॉईज उपस्थीत होते.


Protected Content

Play sound