बुलडाणा जिल्ह्यात उद्यापासून १२ दिवसांचे कडक निर्बंध

 

 

 

बुलडाणा : प्रतिनिधी । ब्रेक द चेन धोरणानुसार बुलडाणा जिल्ह्यातही 20 मेरोजी सकाळी 6 पासून1 जुनरोजी सकाळी 7पर्यंत निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी पारित केले आहे. सुट दिलेल्या सेवांसह हे निर्बंध लागू राहणार आहेत.

 सर्व किराणा , स्वस्त धान्य , भाजीपाला , फळ विक्रेते, मिठाई तसेच सर्व प्रकारची खाद्य पदार्थाची दुकाने (चिकन, मटन, मासे आणि अंडी ), पाळीव प्राणी खाद्य पदार्थांची दुकाने, पेट्रोल पंप, डिझेल पंप, सीएनजी गॅस पंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे.  दुध व दुग्धजन्य पदार्थ (डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी)  दुकाने सकाळी 6 ते  9 व संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील.  घरपोच दुध विक्री  सुरू राहील. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने, पावसाळी हंगाम सामग्री   दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील.  सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर, सॅनीटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल . पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते रात्री 8 या कालावधीत शासकीय मालवाहतूक, रूग्णवाहिका अत्यावश्यक वाहनांकरीता तसेच शेतातील कामे व मालाची वाहतुक करण्याकरीता शहानिशा करून ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना डिझेल इंधन पुरवठा करता येणार आहे. एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग, हायवेवरील पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील. 

देशी आणि विदेशी दारूच्या दुकानदारांना  केवळ सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येईल. अशी  घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत चालु ठेवण्यास परवानगी राहील. कोणत्याही परिस्थीतीत ग्राहकास दुकानात जाऊन खरेदी करता येणार नाही. वकील  , चार्टड अकाऊंट यांची कार्यालये सकाळी 10 ते संध्या 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. ऑप्टीकल्सची दुकाने सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास मुभा असेल. सराफा व्यावसायिकांना दुकाने उघडुन तपासणी करण्याकरीता दुकान सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवता येईल. सीएससी केंद्र सकाळी  9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. 

 सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, बिगर बॅकिंग वित्तीय संस्था, सुक्ष्म वित्तीय संस्था, सहकारी संस्था, पतपेढी, विमा, पोस्ट पेमेंट बँक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.  बँकांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्याव्यात, एटीएममध्ये 24 तास रक्कम उपलब्ध राहील, याबाबत बँकांनी नियोजन करावे. खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे बँकांनी शेतकऱ्यांची पीक कर्जाची कामे प्राधान्याने पुर्ण करावी असेही जिल्हाधिकार्यांचे आदेश आहेत 

  हॉटेल, रेस्टारंट, खानावळ  यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 7 ते  रात्री  8 वाजेपर्यंत सुरु राहील. ग्राहकास हॉटेल, रेस्टारंट, खानावळ येथे स्वत: जाऊन पार्सल घेता येणार नाही.  शिवभोजन थाळी नियमित वेळेनुसार सुरू राहील.  जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या 23 मेपर्यंत बंद राहतील. त्यापुढे टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक यांची राहणार आहे.  आठवडी बाजार बंद राहतील. बॅटरी, इन्व्हर्टर, युपीएस आदी साहित्याची दुकाने आरोग्य यंत्रणेच्या अत्यावश्यक कामासाठी उघडता येतील. मात्र दुकान उघडून मालाची विक्री करता येणार नाही टायर पंक्चरची दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू राहतील. 

   सार्वजानिक, खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा, उदयाने, बगीचे पुर्णत: बंद राहील.  सार्वजानिक ठिकाणी मॉर्निंग वॉक व इवेनिंग वॉक करण्यास बंदी राहील. केशकर्तनालये, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर  बंद राहील. शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारची शिकवणी वर्ग संपुर्णत: बंद राहतील  ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल हे पुर्णत: बंद राहतील. लग्नामध्ये मिरवणुक, जेवणावळी, बँड पथक यांना परवानगी राहणार नाही. लग्नकरीता केवळ 25 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल लग्न सोहळा 2 तासापेक्षा जास्त चालणार नाही 

विवाह सोहळा बेकायदेशीररित्या पार पडणार नाही याची दक्षता शहरी भागात न प  मुख्यधिकारी  व ग्रामीण भागात  गटविकास अधिकारी  , ग्रामसेवक यांनी घ्यावी

 चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक व्यवसाय नाटयगृहे, कलाकेंद्र, प्रेषक गृहे, सभागृहे संपुर्णत: बंद राहील. सर्व खाजगी व सार्वजानिक वैदयकीय सेवा, पशु चिकित्सा सेवा  नियमित वेळेनुसार सुरु राहतील. मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहतील.    गॅस एजन्सीज मार्फत घरपोच गॅस सिलेंडरचे वितरण सकाळी 7  ते सायं 6 या वेळेत करण्यात यावे. 

. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये व आस्थापना निर्बंधांच्या कालावधीत बंद राहतील.  कामकाज   केवळ ऑनलाईन पध्दतीने सुरु ठेवता येईल  केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचेशी संबधीत शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरु राहतील. 

आपले सरकार सेवा केंद्रे व सेतु केंद्रे नगारीकांकरीता बंद ठेवण्यात येत आहेत ऑनलाईन स्वरुपात वेगवेगळया प्रमाणपत्र व सुविधांकरीता अर्ज सादर करता येतील. दस्त नोंदणीचे काम पुर्णपणे बंद राहील.  शासकीय यंत्रणामार्फत मान्सुन पुर्व विकास कामे आवश्यक पाणी पुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहतील. शासकीय यंत्रणांना या करीता वेगळया परवानगीची आवश्यकता नाही.

सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पुर्णत: बंद ठेवण्यात येत आहेत. निवेदन/अर्ज केवळ ऑनलाइन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. ई कॉमर्स मार्फत घरपोच सेवा सुरु राहतील  दुकानदार, हॉटेल यांचे मार्फत घरपोच सेवा पुरविणारे कामगार यांचेकडे ग्राहकांच्या घरी जातांना बिल व दुकानदारामार्फत देण्यात येणार ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील. या कर्मचा-यांना निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील, अहवालाची वैधता 7 दिवसांकरीता असेल.

सर्व सार्वजानिक तसेच खाजगी बस वाहतुक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने यांची वाहतुक नागरीकांना फक्त अत्यावश्यक कामाकरीता अनुज्ञेय राहील.  रुग्णांकरीता रिक्षा व खाजगी वाहनांस परवानगी राहील. जिल्हयाच्या सर्व सिमा सिल करण्यात येत असुन, मालवाहतुक व रुग्णवाहतुक करणा-या वाहनास व शासकीय वाहनास जिल्हयात प्रवेश देण्यात येईल.

मालवाहतुक साठा, खत साठा इत्यादी बाबतीत लोडिंग व अनलोडिंग करण्यास परवानगी राहील.  अत्यावश्यक वैदयकीय कारणांकरीता जिल्हयाबाहेर वाहतुक करावयाची असल्यास http: //covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवरुन ई-पास काढुन वाहतुक करता येईल.  पाणी टंचाई तसेच पाणी पुरवठा संबधीत कामे सुरु राहतील.  प्रसामाध्यमांशी संबंधीत व्यक्ती / पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांचे कार्यालय, सर्व प्रकारचे दैनिक नियतकालिके, वृत्तपत्रांचे वितरण तसेच टि.व्ही. न्युज चॅनल सुरु राहतील.

 या  आदेशाचे उल्लंघन केल्यास  साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.  नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास  प्राधिकृत करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

Protected Content