पिंपळकोठा येथे गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

 

एरंडोल : प्रतिनिधी । पिंपळकोठ येथे एका महिलेने रात्री घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली

 

तालुक्यातील पिंपळकोठा येथे रत्‍नाबाई सुभाष भिल ( वय२६ वर्ष ) या विवाहितेने १८ मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली घराच्या लाकडी सरीला लटकलेल्या अवस्थेत या महिलेचे प्रेत आढळून आले. गावातील लोकांच्या मदतीने प्रेत खाली उतरवण्यात आले एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी  महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

आत्महत्या करण्या मागचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही . रत्‍नाबाई भिल तिच्या पतीसह पिंपळकोठा बुद्रुक या तिच्या माहेरी राहत होती. तिचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील मेहू  आहे.

 

समाधान सोनवणे यांनी खबर दिल्यावरून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो ​कॉ महेंद्र पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

 

Protected Content