चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात रूग्णांना मोफत जेवणाचा पुरवठा करून माणुसकीचा संदेश देणारा वर्धमान धाडीवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळ, सह्याद्री प्रतिष्ठान व संभाजी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात २१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाबाधीत रूग्णांची गैरसोय दुर करून दोन वेळेचे सकस जेवण मिळावा, यासाठी वर्धमान धाडीवाल यांनी रूग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था केलेली आहे. दवाखान्यातून फोन येताच त्यांना जेवणाचा डबा वर्धमान धाडीवाल मित्र मंडळाकडून थेट दवाखान्यात पोहोचवले जाते अशा हा वाढदिवस हा शुक्रवार, २१ मे रोजी आहे. या दिवसाचे औचित्य साधून वर्धमान धाडीवाल मित्र मंडळ, सह्याद्री प्रतिष्ठान व संभाजी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन शहरातील जीवन सुरभी ब्लङ बॅंक, गजानन हाॅस्पिटल येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी सामाजिक भान जोपासत रक्तदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक वर्धमान धाडीवाल यांनी केले आहे.
कोरोनाच्या भयावह काळात रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्याचे प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी केले आहे. रक्तदात्यांना रक्तदानासाठी संपर्क करता यावा यासाठी खाली संपर्क क्रमांक देण्यात आले आहे. शुभम चव्हाण- (9579990666), दिनेश घोरपङे- (9834484449), अविनाश काकङे- 9850772640, पंकज पाटील – 9823780080 व गणेश गवळी – 9028093333 काही अडचण उद्भवल्यास वरील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.