शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील भाऊसो विनोद पन्नालाल जैन वय – ६५ यांचे आज दुपारी १.२० वाजता आकस्मिक दुःखद निधन झाले. येथील प्रसिद्ध मे. शांतीनाथ किराणा दुकानचे मालक होते. त्यांच्यावर उद्या दि. १६ मे रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेंदूर्णी येथील किराणा व्यापारी जितेंद्र व अमित जैन यांचे वडील होत.
विनोद पन्नालाल जैन यांचे निधन
4 years ago
No Comments