यावल तालुक्यातील अवैध धंदे तात्काळ बंद न केल्यास आंदोलनाचा भाजपाचा ईशारा

 

 यावल :  प्रतिनिधी  । सध्याच्या कोरोनाकाळातही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात जोरात सुरु  असलेले अवैध धंदे तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी  दिला  आहे

 

कोरोनाचे थैमान सुरु असतांना   दुसरीकडे मात्र तालुक्यात सर्वत्र अवैध धंद्याना ऊत आला  असुन पोलीस प्रशासनाचे याकडे हेतुपुरस्स्सर  दुर्लक्ष होत आहे या सर्व अवैध  धंधांना तात्काळ बंद न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा ईशारा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी दिला आपण यासंदर्भात लेखी तक्रार वरिष्ठांपर्यंत करणार असल्याची माहीती त्यांनी दिली आहे .

 

उमेशफेगडे यांनी सांगीतले की यावल शहरात व तालुक्यात सर्वत्र जुगारीचे अड्डे , अवैध व बनावट दारूची सर्रास विक्री होत  आहे  बनावट दारू ,गांजा भांग विक्री आणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून जोमाने सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतुक  जोरात सुरु आहे  आसनव्यवस्था व प्रवासी क्षमतेपेक्षा मोठ्या प्रमाणावर अधिक भाडे आकारणी करून होणारी गरजु प्रवासांची होणारी लुट व सोशल डिस्टेंसिग होणारा फज्जा अशा  प्रकारे नागरीकांच्या जिवाशी खेळ केला जात आहे  उघड उघड मिळणाऱ्या दारूमुळे तरूणाच्या जिवनाची राखरांगोळी होत आहे  त्यांच्या कुटुंबांना आर्थीक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने प्रसंगी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीसारखे प्रसंग ओढवले जात आहे .मात्र पोलीस प्रशासनाच्या आर्थीक मोहापोटी सर्व अवैध धंदे मोठया प्रमाणावर सुरू आहेत  कोरोनाच्या नांवाखाली पोलीसांकडुन सर्वसामान्यांना त्रास देवुन कायद्याचा बढगा दाखविला जात आहे असेही ते म्हणाले

 

Protected Content