मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या सावटामुळे सलमान खानचा राधे चित्रपट डिजीटल मंचावरून प्रदर्शीत करण्यात आला असून याला पहिल्याच दिवशी जोरदार ओपनींग मिळाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
यंदाच्या ईदच्या दिवशी सलमान खान आणि दिशा पटानी यांनी अभिनय केलेला राधे चित्रपट हायब्रीड या पध्दतीत रिलीज करण्यात आला. युएईसह काही देशांमध्ये याला थिएटर्समध्ये तर भारतासह बहुतांश राष्ट्रांमध्ये याला डिजीटल मंचावरून रिलीज करण्यात आले. भारतात याला झी५ आणि झीप्लेक्सवरून प्रदर्शीत करण्यात आले. यात पहिल्याच दिवशी तब्बल ४२ लाख लोकांनी राधे चित्रपट पाहिल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या चित्रपटाचे रेव्ह रिव्ह्यूदेखील आले आहेत.
दुधे आणि युएईमध्ये राधेला चांगली सलामी मिळाली आहे. या चित्रपटाने तेथील चित्रपटगृहात बक्कळ कमाई केली आहे. त्याचा येथे प्रीमियरदेखील झाला. येथे फक्त ५० टक्के जागांवर चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची परवानगी आहे. त्यातही पहिल्याच दिवशी चित्रपटाने २ कोटी ७७ लाख रुपये कमावले आहेत. हा चित्रपट इथल्या ७०० हून अधिक थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे.
सलमानचा चित्रपट आधी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होता, पण लॉकडाऊनने सर्व अपेक्षा नष्ट केल्या. यामुळे राधेला डिजीटल मंचावर प्रदर्शीत करण्यात आले. सलमानने यापूर्वी झी स्टुडिओला हा चित्रपट २०० कोटीला विकला होता पण जेव्हा लॉकडाउनसारखी परिस्थिती आली तेव्हा कंपनीने पुन्हा एकदा यावर चर्चा केली आणि सलमानने १९० कोटींमध्ये डील करण्याचे निश्चीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
डिजीटल मंचावर राधे चित्रपटाचे मूल्य २४९ रूपये ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर हा टीव्हीवरही प्रदर्शित होईल.