रावेर, प्रतिनिधी । पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत तांदुळ व गहू वाटप करायला सुरुवात झाले आहे. यासाठी या धान्य वाटपावर लक्ष ठेवण्यासाठी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी रावेर व सावदा शहरासाठी १९ समीत्यांची नियुक्ती केली आली असून त्यांच्यासमोर धान्य वाटप होणार आहे.
लॉकडाऊन काळात मोफत धान्य वाटप करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार वेग-वेगळे धान्य वाटप करत आहे. प्रती व्यक्ती पाच किलो प्रमाणे तांदूळ व गहू मिळणार आहे. धान्य गरीब कुटुंबाच्या घरापर्यंत पोहचावे म्हणून तहसीलदार यांनी रावेर व सावदा शहरासाठी वेग-वेगळ्या १९ समित्यांची नेमणुक केली आहे. ग्रामीण भागासाठी वेगळ्या समित्या असणार आहे. रावेर गोडाऊनवर राज्य सरकारचे देखिल धान्य प्राप्त झाले असून त्याचे देखील वाटप सुरु झाले आहे.