चाळीसगाव प्रतिनिधी । महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी तालुक्यातील न्हावे गावात पदाधिकारी, ग्रामस्थांसह युवावर्गाशी सवांद साधला. त्यांनी ग्रामस्थांना राष्ट्रवादी आघाडीला मतदान करण्याचे सांगत परिवर्तनाचे आवाहन केले.
या प्रचार फेरी गुलाबराव देवकर यांच्या सोबत पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष श्याम देशमुख , महानंदाचे संचालक प्रमोद बापू पाटील, जिल्हा परिषद गटनेते शशिभाऊ साळुंखे, जि.प. सदस्य भूषण पाटील, डॉ.शहाजीराव देशमुख, मंगेश पाटील,भगवान बापू पाटील, रामचंद्र जाधव, मिलिंद जाधव, कॉग्रेसचे नेते अशोक खलाणे, अनिल निकम , अॅड. प्रदिप आहिरराव ,योगेश पाटील, रिपाई कवाडे गटाचे कालिदास आहिरे, मालू आप्पा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.