कोरोना काळात परिचारीकांचे योगदान मोलाचे- डॉ. उल्हास पाटील (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना काळात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारीका प्रामाणिकपणे सेवा देत आहे.  जागतिक परिचारीका दिवस साजरा करतांना परिचारीकांचेही योगदार अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात केले.

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये बुधवार १२ मे रोजी जागतिक परिचारीका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फ्लोरेन्स नाईटेंगल यांच्या प्रतिमेला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते मार्ल्यापण करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, प्रभारी प्राचार्य  विशाखा वाघ, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्रा.अश्विनी वैद्य , प्रा.मनोरमा इसाक, प्रा.संकेत पाटील, ह्यांची उपस्थीती होती. 

यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांनी देखील परिचारिकांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार व्यक्‍त केले.  परिचारिका दिनाचे थेट प्रक्षेपण यू-ट्युब, फेसबुक च्या माध्यामातून सर्व विद्यार्थ्यांना लाईव दाखविण्यात आले.

कोविड काळात समर्पित सेवा देणार्‍या फ्रंटलाईन कोरोना योद्धांचा आज मान्यवरांच्या हस्ते प्रा.संकेत पाटील, चिन्मय शुक्‍ला, दिप्ती राऊत, आकाश धमक, ज्ञानेश्‍वर राठोड, डिंपल लाघोटे, जुबेर खाटीक यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रिया जाधव यांनी केले.

 

Protected Content