तीन गोष्टींमुळे मोदी सरकार नाराज झालं असेल; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  सीबीआयला राज्य सरकारच्या  परवानगीशिवाय तपासाला मनाई , अर्णब गोस्वामी कारवाई आणि खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात आम्ही घेतलेल्या भूमिकांमुळे नाराजीतून उट्टे काढण्याचे राजकारण मोदी सरकार करीत असावे असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केला

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केला आहे. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

देशमुखांनी  ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी खळबळजनक आरोपही केले आहेत. आपण न केलेल्या गुन्हांची शिक्षा देण्याचं काम केवळ राजकीय हेतुपोटी चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

 

त्यांना आपली ईडीकडून चौकशी होणार ही बाब माध्यमांमधून कळली असल्याचंही ते म्हणाले. त्यांनी मोदी सरकारवर काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणतात, “मी गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणामध्ये कारवाई केली. त्याचबरोबर पूर्वी महाराष्ट्रात सीबीआयला कोणाचाही तपास करण्याची मुभा होती. मात्र शासनाच्या परवानगीशिवाय कोणाचाही तपास करता य़ेणार नाही असा निर्णय आम्ही घेतला. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर तो प्रश्न जेव्हा विधानसभेत निघाला तेव्हा आमदारांच्या मागणीनुसार चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक केली. या सगळ्या कारणांमुळे केंद्र शासन नाराज असू शकते. म्हणूनच माझी सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी होत आहे.”

 

त्याचबरोबर आपण सीबीआयला जसं सहकार्य केलं त्याच पद्धतीने ईडीच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सत्य परेशान हो सकता है, पराजित नही असंही ते या व्हिडिओमध्ये म्हणाले.

 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि संजय पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, त्याचबरोबर अनेक अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ते भ्रष्ट मार्गाने करत होते, असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आले आहेत.त्यामुळेच त्यांची आता ईडीकडूनही चौकशी होणार आहे.

Protected Content