Home क्राईम चोपडा शहरातून पॅजो रिक्षाची चोरी

चोपडा शहरातून पॅजो रिक्षाची चोरी


चोपडा प्रतिनिधी । शहरातील नारायण नगरातून ३५ हजार रूपये किंमतीची पॅजो रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर नारायण पाटील (वय-४८) रा. चाळेश्वर गल्ली चोपडा हे व्यापारी आहे. त्याच्याकडे व्यापार करण्यासाठी मालवाहू पॅजो रिक्षा आहे. ५ मे रोजी सायंकाळी पॅजो रिक्षा (क्रमांक एमएच १९ एस ९०१०) पॅजो रिक्षा दुकानासमोर लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रूपये किंमतीची पॅजो रिक्षा चोरून नेल्याचे ६ मे रोजी सकाळी उघडकीला आले आहे. ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound