मातृदिनानिमित्त टायगर ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर

 

सावदा,प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटामुळे सध्या राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी आज मातृदिनानिमित्त  टायगर ग्रुप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यत आले.

९ मे रोजी जागतिक मातृदिनानिमित्त टायगर ग्रुप सावदा शहरतर्फे टायगर ग्रूप अध्यक्ष  डॉ. तानाजी जाधव,  टायगर ग्रूप उत्तर महाराष्ट्राचे सागर कांबळे,  टायगर ग्रूप खान्देश अध्यक्ष पै. ऋषीकेश भांडारकर व टायगर ग्रुप जळगाव जिल्हा प्रमुख डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.यावेळी २० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी टायगर ग्रुप सावदा शहर सदस्य यश भेरवा, स्वप्नील तायडे, अजय चौधरी, निखिल लोखंडे, हेमंत चौधरी, मयुर तायडे, समर्थ कुलकर्णी, आकिब तडवी, शुभम चौधरी, अरबाज कुरेशी, अजय पांडव, विनय महाजन,पिंटू नारखेडे, दुर्गेश गाजरे, गौरव पाटील, बुध्दभूषण बागडे आदी उपस्थित होते.

Protected Content