चाळीसगाव येथे पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी भाजपचा जाहीर निषेध

चाळीसगाव प्रतिनिधी । नुकतीच पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराने उग्र रूप धारण केलेला असल्याने भारतीय जनता पक्षाने याचे निषेध केले असून याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशा देशात थैमान घातलेले आहे. तरीही कुठलीही परवा न करता पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुक पार पडली. मात्र विधानसभा निवडणुक निकाल लागताच मोठ्या प्रमाणात येथे हिंसाचार घडत आहे. याच्या निषेधार्थ चाळीसगावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत पालवे, चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम व पंचायत समितीचे गटनेते संजुतात्या पाटील आदींच्या यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Protected Content