Home आरोग्य राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना कोरोनाची बाधा

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना कोरोनाची बाधा

0
36

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आज याबाबतची माहिती सोशल मीडियातून जाहीर केली आहे.

अभिषेक पाटील यांचा वाढदिवस कालच साजरा करण्यात आला. कोरोनाच्या आपत्तीमुळे त्यांनी यंदा कोणत्याही सार्वजनीक कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. यानंतर आज त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाला पॉझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून आपण उपचार घेत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेऊन स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन देखील अभिषेक पाटील यांनी केले आहे.

 


Protected Content

Play sound