नांदुरा, अमोल सराफ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या संचारबंधीमुळे हनुमान जन्मोत्सव साध्या परंतु पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात संचारबंदी असल्याने भाविकांनी मंदिरांमध्ये जाण्याचे टाळले. अनेकांनी घरीच पूजाअर्चा करून जप केला. बुलढाणा जिल्ह्यातील नागपूर -मुंबई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हनुमानाच्या मुर्तिची देशातील तिसऱ्या क्रमांकाची मुर्ती म्हणुन नोंद झालेली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ३५० किलोचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा सुद्धा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळापैकी एक नांदुरा येथील हनुमान मूर्ती आहे. मात्र या ठिकाणीही भक्तांना प्रवेश नसल्याने भक्तांनी रस्त्यावरूनच हनुमानाचे दर्शन घेतले. तत्पूर्वी संस्थांच्या वतीने कोविड१९ च्या नियमांचे पूर्णपणे पालन करीत पूजाअर्चा, महाआरती करण्यात आली. तर जिल्ह्यातील अनेक भागात यंदा संचारबंदीमुळे भाविकांनी मंदिरात न जाता घरीच पूजाअर्चा, जप केला.