जळगाव प्रतिनिधी । बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तसेच तणनाशकाला सहनशील असणारे औषध शेतकऱ्यांनी घेवू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तणनाशकाला सहनशील असणारे Transgenic Glyphosate/Herbicide Tolerant trait औषध वापरुन अनेक बोगस कंपन्या बियाणे उत्पादन करुन विकत आहे. एचटीबीटी या अवैध कापुस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरीकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता खरीप हंगाम 2021 मध्ये कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या वाणांची लागवड करु नये. तसेच या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 0257-2239054 वर कळविण्याचे आवाहनही संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.