सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा महाविकास विद्यार्थी संघटनेतर्फे सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय लेवा महाविकास विद्यार्थी संघटनेतर्फे वक्तृत्व स्पर्धा सर्टफिकेट व आकर्षक बक्षीसासह ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.आपल्यातील उत्कृष्ट वक्ता सादर करण्याकरिता जळगाव जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व युवकांसाठी घरबसल्या ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या स्पर्धेत प्रथम गट तिसरी ते सहावी वेळ ४ मिनिटे , द्वितीय गट सातवी ते दहावी वेळ ५ मिनिटे, तृतीय गट अकरावी ते पदवीधर वेळ ६ मिनिटे असे असून त्या स्पर्धेच्या नियम व अटी आपल्या वक्तृत्वाचा व्हिडिओ दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर दि. २६ एप्रिल २०२१ पर्यंत पाठवावे. वक्तृत्वाचा व्हिडिओ दिलेल्या गट, वेळ व विषय यानुसार असावा. वक्तृत्वाचा व्हिडिओ मराठी भाषेतच असावा. व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवताना संपूर्ण नाव, पत्ता, वर्ग व संपर्क क्रमांक पाठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. वक्तृत्वाचा व्हिडिओ शूटिंग करतांना कमीत कमी आकारमानाचा होईल याची काळजी घ्यावी. जेणेकरून व्हिडिओ पाठवताना अडचण येणार नाही. विडिओ मधे कोणत्याही प्रकारची एडिटींग नसावी, आपल्या वक्तृत्वाच्या व्हिडिओ परीक्षणाचे काम सुजाण परीक्षक करणार आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील., प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीसासाठी कळविण्यात येईल आणि उर्वरित सहभागींना व्हॉट्सअपद्वारे सहभाग प्रमाणपत्र पाठवण्यात येईल.
दरम्यान, विडिओ अपलोड झाले की, दि. २६ एप्रिल पासुन ते ५ मे पर्यंत लाईक्स आणि कमेंट्स चे परीक्षण केले जाईल. लाईक्स आणि कमेंट्स ला ५० मार्क्स आणि परिक्षणाला ५० मार्क्स राहतील. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता विजेत्याचे नाव घोषित केले जातील. या संदर्भात अधिक माहितीसाठी ८००७०३४८२१ आणि ९३७०३८५४९७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अॅड सागर सरोदे -जिल्हाध्यक्ष; हर्षल चौधरी-उपजिल्हाध्यक्ष; सायली महाजन-महिला तालुकाअध्यक्ष; खुशबू पाटील-यावल तालुका सचीव आणि मोहित धांडे-सोशल मीडिया प्रमुख यांच्यासह अन्य सदस्य परिश्रम घेत आहेत.