यावल न.प. व आरोग्य पथकातर्फे २८४ जणांची अँटीजन तपासणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यात सर्वत्र कोरोना विषाणु संसर्गाची अत्यंत वेगाने पसरत असून कोरोनाच्या दुसरी लाटेमुळे अनेक बेसावध लोकांना जीव गमवावे लागत आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावल नगर परिषद आणि आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन शहरातील विविध व्यापारी संकुल, भाजीपाला फेरीवाले व्यापारी, फळ विक्रेते हॉटेल व्यवसायीक व विना मास्क फिरणाऱ्या २८४ नागरिकांची अँटीजन तपासणी करण्यात आली. 

आज शहरात २८४ जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली असुन यात धक्कादायक प्रकार म्हणजे शहरात एकाच कुटुंबातील पाच जण पॉझीटीव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . आज सायंकाळ पर्यंत एकुण २८४ जणांची अॅन्टीजन तपासणी करण्यात आली असुन यात यावल शहरातील १५ पोझीटीव्ह तर २ पॉझीटीव्ह हे बाहेर गावाचे आले असुन यातील २६७जणांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याची माहीती यावल नगर परिषदच्या अॅन्टीजन तपासणी मोहीम पथकातील नगर परिषद कार्यालयीन अधिक्षक विजय बढे, आरोग्य निरीक्षक शिवानंद कानडे , रवीन्द्र काटकर ,नितिन पारधे , राजेन्द्र गायकवाड , रामदास घारू, लखन घारू, संदीप पारधे , विश्वनाथ गजरे आदी नगर परिषद कर्मचारी यांनी यात सहभाग घेतला , त्याचप्रमाणे यावल ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके व त्यांचे आरोग्य कर्मचारी यांनी ही पोलीसांच्या वतीने पकडण्यात आले त्यांची अॅन्टीजन तपासणीचे कार्य केले . तसेच पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने विनाकारण रिक्याम्या फिरणाऱ्या एकुण १०जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

 

Protected Content