जिल्हा परिषद व पंचायत समिती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सोनवणे

यावल प्रतिनिधी । जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे-पाटील यांनी केली आहे. 

त्यांच्या निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, वसंत महाजन, जि.प.सदस्य आर.जी.पाटील, सुरेखा पाटील, पं.स.चे माजी सभापती लिलाधर चौधरी, बामणोदचे माजी सरपंच शिवराम तायडे, पं.स.गटनेते शेखर पाटील, पं.स.सदस्य सर्फराज तडवी, कालिमा तडवी, कृउबा माजी सभापती नितीन चौधरी, न.पा. गटनेता सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, कलीन मन्यास, काँग्रेसचे शहराध्यक्ष कादीर खान, माजी सभापती उपसभापती उमाकांत पाटील, फैजपुर शहराध्यक्ष रियाज भाई आदींनी अभिनंदन केले आहे.

शासनाकडून येणाऱ्या निधीचा जिल्हा परिषदेत समान वाटप होवून कुठल्याही सदस्यांवर अन्याय होणार नाही व शासकिय कामांत दैनंदीन येणाऱ्या अडीअडचणी व त्यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. जळगाव जिल्हा परिषदचे एकुण ६७ सदस्य व जिल्ह्यात १३४ पंचायत समितीच सदस्य आहे. असोसिएशन महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटनेच्या अध्यक्षपदाची जी जबाबदारी संघटनेने सोपवली असून ती जबाबदारी पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न करेल, सध्या जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आली असून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी खूप अडचणी येत आहे. परंतु संघटनेच्या माध्यमातून सर्वपक्षीय जि.प. सदस्यांना सोबत घेवुनआवाज उठून निश्चीत प्रयत्न करू असे आश्वासन प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.

Protected Content