भुसावळ प्रतिनिधी । भुसावळचे आमदार संजय सावकारे Sanjay Savkare हे अल्प काळासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांनी जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन प्लांट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र काही राजकारण्यांच्या आठमुठेपणामुळे ही सिस्टीम उभी राहिली नाही. आता कोरोनाचा कहर सुरू असतांना आमदार सावकारे यांची ‘संजय दृष्टी’ ही काळाच्या किती पुढे होती हे दिसून आले आहे. मात्र राजकारण आडवे आल्याने प्राणवायूचा प्रकल्प उभा राहिला नाही. आणि आता जिल्हावासियांना याची जबर किंमत मोजावी लागत आहे.
याबाबत वृत्त असे की, कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असतांनाच ऑक्सीजनचा तुटवडा भासू लागला आहे. यात भुसावळात तर प्राणवायूच्या उपलब्धतेची स्थिती खूप गंभीर बनलेली आहे. या पार्श्वभूमिवर, भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी लोकसहभागातून Livetrends News ऑक्सीजन पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासोबत डॉ. पाटील यांनी सोशल मीडियात एका पोस्टच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री आ. संजय सावकारे Sanjay Savkare यांच्या दुरदृष्टीबाबतची माहिती दिली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, भुसावळचे आमदार संजय सावकारे हे जळगाव जिल्हा पालकमंत्री असतांना Livetrends News त्यांच्या अध्यक्षतेखाली दि.१९.११.२०१३ रोजी झालेल्या डीपीडीसी अर्थात जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरू संजय सावकारे यांनी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मागणीनुसार सिव्हील हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट उभा करण्याचे निर्देश दिले होते.
सिव्हील हॉस्पीटलमध्ये गोरगरिबांवर उपचार होत असतले तरी प्राणवायू उपलब्ध नव्हता. यापुढे ऑक्सिजन अभावी रुग्णांनाचे प्राण जाउ नयेत म्हणून संजय सावकारे यांनी जिल्हा रुग्णालयात ओ.जी.एस. म्हणजे ऑक्सिजन जनरेशन सिस्टीम उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला होता. यात त्यांनी १५० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ३५० ते ४५० खाटा झाल्याने रूग्णांना ऑक्सिजन देण्यात अडचण येते.सतत २४ तास अखंडित ऑक्सिजन मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीद्वारे १.५० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला होता.
तत्कालीन पालकमंत्री संजय सावकारे Sanjay Savkare यांच्या या प्रस्तावला काही नेत्यांनी विरोध केला. Livetrends News जळगाव जिल्हात रस्ते उभारण्यासाठी पैसे नसल्याने एवढा निधी उपलब्ध करता येणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. यामुळे एनआरएचएम या केंद्राच्या योजनेतून संबंधीत प्रकल्पासाठी निधी घ्यावा असे सुचविण्यात आले. म्हणजेच डीपीडीसी ऐवजी हा प्रोजेक्ट केंद्राकडे ढकलण्यात आला. आणि अर्थातच, याला नाकारण्यात आले. पुढे निधी मंजूर करण्यात आला पण प्रशासकीय कारवाई काहीच झाली नाही. त्यामुळे हे प्रकरण थंड बस्त्यात गेले.
आता विचार करा, जळगाव जिल्हा रुग्णालयात सन २०१३-१४ मध्येच ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट उभा राहिला असता तर आज जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा राहिला नसता. सर्व रुग्णांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवला गेला असता. रुग्णांचे हाल आणि नातेवाईक यांनी धावपळ थांबली असती. कोरोना संक्रमण काळ आरामात थोपवून ठेवता आला असता. विशेष म्हणजे संबंधीत प्लांटद्वारे रुग्णांना बेडवरच ऑक्सिजन देण्याची सुविधा होतीच पण त्याचबरोबर बाह्य ऑक्सिजन सिलेंडर भरण्याची सुविधा असेल अशी माहिती संजय सावकारे यांनी दिली होती. Livetrends News त्यामुळे जळगाव जिल्हाच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांची ऑक्सिजनची गरज सुध्दा भागवली गेली असती. त्यावेळेस मांडलेल्या प्रस्तावाला प्रशासनाने नकार दिला तरी इतर जिल्हा नेते यांनी देखील संजय सावकारे यांना पाठिंबा दिला नाही. आणि आज त्याची जबर किंमत जळगाव जिल्हा भोगत आहे. आज प्रकल्प उभा असता तर जळगाव जिल्हाचे चित्र वेगळे असते.
याबाबत डॉ. नि. तु. पाटील यांनी शेवटी नमूद केले आहे की, महाभारतात एक संजय होते,ज्यांना दूरदृष्टी असून देखील कौरवांच्या प्रशासकीय कारभाराने हतबल होते. आणि हे दुसरे दूरदृष्टी असलेले आमदार सावकारे जे जळगाव प्रशासकीय कारभाराने हतबल आहेत. दोघांना दूरदृष्टी होती,पण जनतेचा फायदा कशात आहे हा तत्कालीन प्रशासनाकडे दृष्टीकोन नव्हता, आणि आज त्याचे विपरीत परिणाम सर्व जळगाव जिल्हा नागरिक सोसत आहेत…! Livetrends News
जळगाव जिल्हाचे राजकारण शापित आहे हे वाचले होते पण आता जळगाव जिल्हा प्रशासन पण त्याच मार्गाकडे वाटचाल तर करत नाही ना…?