जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच एकाचवेळी ३१६ कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीचे जंबो आदेश आज शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पारित केले आहेत. या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीनाईक, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार व सहाय्यक फौजदार याप्रमाणे पदोन्नती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकाळानुसार पात्र पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल तसेच पोलीस हवालदार या कर्मचार्याची पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यात पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी या प्रक्रियेसाठी कमिटी तयार केली होती. यात स्वतः मुंढे याच्यासह अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे, आस्थाना शाखेतील दीपक जाधव, सुनील निकम यांचा समावेश होता. अधीक्षक मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कमिटीने अहोरात्र परिश्रम करुन पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. आज शुक्रवारी डॉ. प्रवीण मुंढे यांनी याबाबतचे आदेश पारित केले.