Home Cities एरंडोल भातखेडे येथे लोखंडी पत्र्यांची चोरी; कासोदा पोलीसात गुन्हा दाखल

भातखेडे येथे लोखंडी पत्र्यांची चोरी; कासोदा पोलीसात गुन्हा दाखल

0
47


एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील भातखेडे येथील गावठाण शेतातून १६ हजार रूपये किंमतीचे पत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, संजयाबाई छगन बडगुजर (वय-५८) रा. भातखेडे ता. एरंडोल यांचे भातखेडे गावातील गावठाण येथे मोकळ्या जागेवर नवीन पत्राचे शेड बांधण्याचे काम सुरू होते. त्यावेळी त्याठिकाणी १६ हजार रूपये किंमतीचे १६ पत्रे आणि १ हजार रूपये किंमतीचा ॲगल असा एकुण १७ रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. १३ एप्रिल ते १४ एप्रिल सकाळी १० वाजेदरम्यान घडली. संजयाबाई यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास हडप करीत आहे. 


Protected Content

Play sound