Home Cities जळगाव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातील गवताला आग (व्हिडीओ)

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातील गवताला आग (व्हिडीओ)

0
40

जळगाव प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरातील कोरड्या गवताला आज १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली होती. महापालिकेच्या दोन बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मोकळ्या आवारात आज १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कोरड्या गवताला अचानक आग लागली होती. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. सुरूवातीला किरकोळ लागल्याचे पाहून परिसरातील नागरीकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्नीशमन पथकाने क्षणाचाही विलंभ न करता तातडीने घटनस्थळी धाव घेवून १ तासाच्या परिश्रमानंतर ही आग विझविण्यात आली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/513547693137189

 


Protected Content

Play sound