Home राष्ट्रीय घुसखोरीच्या प्रयत्नात असलेली पाकची एफ-१६ विमाने भारतीय हवाई दलाने पुन्हा पिटाळली

घुसखोरीच्या प्रयत्नात असलेली पाकची एफ-१६ विमाने भारतीय हवाई दलाने पुन्हा पिटाळली


 

pakistani airforce 650x 2019022711201995 1

 

अमृतसर (वृत्तसंस्था) पाकिस्तानच्या एफ-१६ या लढावू विमानांनी आज पहाटे पंजाब नजीक नियंत्रण रेषेजवळ भारताच्या हद्दीत घुसण्याचा पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, सावध असलेल्या भारतीय हवाई दलाने या ताफ्याला पिटाळून लावले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पजाबला लागून असलेल्या खेमकरण सेक्टरमध्ये हा प्रकार घडला आहे.

सोमवारी पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी हवाईदलाची एकूण चार एफ-१६ लढाऊ विमाने आणि एक यूएव्ही (ड्रोन) भारतीय हद्दीत आढळले. रडारवर विमानांच्या हालचाली दिसताच भारतीय अधिकाऱ्यांनी हवाईदलाला सावध केले. धोका लक्षात आल्याबरोबर पाकिस्तानी विमानांना उत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज विमानांनी उड्डाण केले आणि पाक विमानांना पळवून लावले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound