चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथील शिवारातील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकत दुचाकीसह रोकड जप्त करून नऊ जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कोरोनाची साथ सुरू असल्याने कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू आहे. पाच पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये असे निर्देशन शासनाने दिले आहे. अशात तालुक्यातील पातोंडा येथे शेत शिवारातील ज्वारी पेरलेल्या शेताच्या बाजूला पडीक जागेवर जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या अनुषंगाने पोलीस पथकाने त्या जुगार अड्डावर छापा मारला. त्यात २,६०,००० रुपये किंमतीचे मोटारसायकली व ५७,३२० रुपये रोख असे एकूण ३,१७,३२० किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. एकूण नऊ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात खुशाल महाले (४०) रा. पातोंडा, अनिस खाटीक (४०) रा. वाघळी, अशोक गायकवाड (४०) रा. पातोंडा, पांडुरंग चौधरी (३०) रा. पातोंडा, आरिफ खाटीक (३४) रा. पातोंडा, योगेश कोष्टी (४२) रा. पाटणादेवी रोड, सुमित सोनवणे (२५) रा. घाटरोड, सोनु महाजन (४२) रा. पातोंडा, जाकीर फारूख (३२) रा. नागदरोड, सर्व ता. चाळीसगाव आदींवर शहर पोलिस स्टेशनला रात्री १०:०६ वाजता भादंवी कलम १८८, २६९, २७० सह पो. अधि. कलम ३७ (१) , (३) चे उल्लंघन १३५, १४४ व महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ नुसार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार पोना/१४७२ प्रभाकर बाळासाहेब पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या आदेशानुसार सपोनि पवन देसले, पोहेकॉ/२५०० मिलिंद शिंदे, पोना/९७१ प्रताप मथुरे, पोकॉ/१६४४ गोरख चकोर, पोकॉ/१३१६ शैलेश माळी सर्व नेमणूक मेहूणबारे पोलिस स्टेशन. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार सपोनि सचिन कापडणीस, पोना/७४४ शैलेश पाटील व पोकॉ/१४२२ शरद पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोहेकॉ/४०९ दिलीप जाधव, पोना/२८०६ नितीन पाटील आदींचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस कर्मचारी धर्मराज पाटील हे करीत आहेत.