खोट्या माहितीची धमकी देत तरुणीवर अत्याचार

 

जळगाव प्रतिनिधी । घरच्यांना खोटी माहिती सांगेन अशी धमकी देत महिलेच्या मदतीने तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली आहे. महिलेसह तरूणाला अटक करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा येथे राहणारी १८ वर्षीय तरूणी कुटुंबियांसह राहते. तरूणीची आरती सचिन महाजन ( रा. शहापूर जि. बऱ्हाणपुर  , मध्यप्रदेश) या महिलेशी ओळख झाली. ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरूणी एकटी घरी असतांना आरती महाजन या महिलेने सांगितले की, विवेक मराठे (पुर्ण नाव माहित नाही) याला तु आवडेस म्हणून असे सांगून तुझ्या आईवडीलांना खोटी माहिती सांगेन अशी धमकी देत विवेक मराठेशी संबंध ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर  विवेक मराठेने पिडीत मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे करीत आहेत .

Protected Content