जळगाव प्रतिनिधी । हॉटेलात खाण्यापिण्यावरून किरकोळ वाद होवून तरूणाच्या डोक्यात लाकूड टाकून गंभीर दुखापत केल्याची घटन हॉटेल गारवा येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ गणेश पवार (वय-२५) रा. हॉटेल गारावा, जळगाव खुर्द हा तरूण राष्ट्रीय महामार्ग हॉटेल गारवा येथे कामाला आहे. राजू धनगर आणि गोपाळ पवार हे हॉटेलच्या कामानिमित्ताने खाण्यापिण्यावरून ५ एप्रिल रोजी किरकोळ वाद झाला होता. मध्यरात्री गोपाळ पवार हा हॉटेलात काऊंटरच्या बाजूला झोपलेला असतांना रात्री ३ वाजेच्या सुमारास राजू धनगर याने डोक्यात हॉटेलच्या भट्टीसाठी लागणारे लाकूड डोक्यात टाकून गंभीर जखमी केले. गोपाळ पवार याची प्रकृती गंभीर असून बेशुध्दावस्थेत आहे. हॉटेल मालक मुरलीधर माळी यांच्या फिर्यादीवरून ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संशयित आरोपी राजू धनगर याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण करीत आहे.