Home Cities जळगाव नंदू रायगडे यांना पितृशोक

नंदू रायगडे यांना पितृशोक

0
106

जळगाव प्रतिनिधी । येथील अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ रायगडे यांचे वडील सुकलाल रायगडे यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

भातखंडे ता. एरंडोल येथील मुळ रहिवासी तथा सध्या जळगावात वास्तव्यास असणारे सेवानिवृत्त अभियंता सुकलाल रायगडे यांचे आज अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते.

मराठा समाजातीलजळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला वकील अ‍ॅड. लिलावती चौधरी-रायगडे यांचे पती तर मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते रेड स्वस्तिकचे संस्थापक सदस्य नंदुभाऊ रायगडे; अभियंता प्रविण रायगडे आणि अभियंता अतुल रायगडे यांचे ते वडील होते.

सुकलाल रायगडे यांच्या निधनाचे वृत्त येताच समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. रेड स्वस्तिक सोसायटी, छत्रपती शिवाजी ब्रिगेड परिवाराकडून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound