जळगाव प्रतिनिधी । कोविड पार्श्वभूमीवर आज जळगाव खुर्द येथील ग्रामस्थांची ताप मोजणी, ऑक्सीजन तपासणी उपक्रम गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाने राबविला. प्रत्येक ग्रामस्थाच्या घरी जावून घरातील प्रत्येक सदस्याची यावेळी तपासणी करण्यात आली.
सर्वप्रथम जळगाव खुर्द येथील ग्रामपंचायत परिसरात उपसरपंच दिनेश पाटील, सदस्य दिपक पाटील, नारसिंग वसावे, संजना गोपवाड, शांती पावरा यांच्यासह गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या चतुर्थ वर्ष आणि जीएनएमच्या तृतीय वर्षातील इंटरशिपच्या विद्यार्थ्यांसमवेत प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे आदिंची उपस्थीती होती. याप्रसंगी गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यत सर्वांची ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन, पल्स आणि ताप मोजणी यंत्राद्वारे ताप तपासण्यात आला.
तसेच कोरोना लक्षणांबद्दल ही जनजागृती करत सतत साबणाने हात धुणे, जेथे शक्य नाही त्यावेळेस सॅनिटायझरचा वापर करणे, संपूर्ण नाक झाकल जाईल तसे मास्क वापरणे आणि घरात असो वा बाहेर एकमेकांशी संवाद साधतांना अंतर राखणे अशी काळजी घेतल्यास कोरोना आपणास टाळता येईल असेही याप्रसंगी ग्रामस्थांना सांगण्यात आले. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे प्रा.जसनीत दाया, प्रा.रेबिका लोंढे, प्रा.निर्भय मोहोड, प्रा.प्रिया जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून ही तपासणी मोहिम सुरु करण्यात आली होती. या मोहिमेसाठी प्राची रणगरी, प्राजक्ता सावरकर, प्रिया लभाणे, संजना सूर्यवंशी, अदनान चौधरी, कुणाल वानखेडे आदिंनी परिश्रम घेतले.