Home Cities जळगाव तापी पाटबंधारे विभागासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद इंगळे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडिओ)

तापी पाटबंधारे विभागासमोर वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद इंगळे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडिओ)

0
42


 

जळगाव प्रतिनिधी । १४ सुरक्षा रक्षकांनी खोटा आरोप केल्यावर तक्रार दिल्यानंतर त्यांना पाठिशी घालणारे उपकार्यकारी अभियंता यांच्यावरही कारवाई व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद इंगळे यांनी बेमुदत उपोषण केले होते. मात्र याची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज ८ एप्रिल रोजी इंगळे यांनी तापी पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल टाकून अत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

सविस्तर माहिती अशी की, २० जानेवारी रोजीपासून माध्यम प्रकल्प मंडळात १४ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या १४ सुरक्षा रक्षकांकडून प्रमोद इंगळे यांनी पैशांची मागणी करतो अशी खोटी तक्रार १४ सुरक्षा रक्षकांनी पाटबंधारे वाघुर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली होती. इंगळे यांना तक्रारीबाबत माहिती मिळाल्यानंतर, आपल्याविरूध्द तक्रार दिली असल्यामुळे संबंधित १४ सुरक्षा रक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी माहिती आधिकाराचा वापर करून सुरक्षा रक्षक कार्यरत असलेल्या जागेचे सीसीटीव्ही फुटेज मिळावे यासाठी उपकार्यकारी अभियंता तथा जन माहिती अधिकारी सी. के. पाटील यांच्याकडे २३ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. दरम्यान, सीसीटीव्ही देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासावे १४ सुरक्षा रक्षकांनी केलेल्या तक्रारीनुसार दोषी आढळ्यास आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा त्या १४ सुरक्षा रक्षकांना सेवामुक्त करण्यात यावे आणि जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता सी. के. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी तापी पाठबंधारे कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज तापी पाठबंधारे कार्यालयासमोर प्रमोद इंगळे यांनी अंगावर पेट्राल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने जिल्हा पेठ पोलीसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. जिल्हा पोलीसांनी इंगळे यांना ताब्यात घेतले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/164625502196857

 


Protected Content

Play sound