Home Cities जळगाव वळसे पाटलांना गृहमंत्रीपद : जळगावात राष्ट्रवादीचा जल्लोष ( व्हिडीओ)

वळसे पाटलांना गृहमंत्रीपद : जळगावात राष्ट्रवादीचा जल्लोष ( व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । दिलीप वळसे पाटील यांची गृहमंत्रीपदी बढती करण्यात आली असून ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज जळगावात महानगर राष्ट्रवादीतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आली.

कालच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे या मंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे. या निर्णयाचे आज महानगर राष्ट्रवादीचे आनंदोत्सव साजरा करून स्वागत केले.

यानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर घोषणाबाजी करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले की, वळसे पाटील हे माझे राजकीय गुरू असून त्यांच्या नियुक्तीचे आम्ही स्वागत केले आहे. अनिल देशमुख यांच्यावर काही आरोप झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असून त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेला आहे. तर भाजपकडे ही नैतिकता नसल्याचा टोला त्यांनी मारला.

याप्रसंगी महानगराध्यक्ष अभिषक पाटील, कल्पना पाटील, स्वप्नील नेमाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/758527708182571

 


Protected Content

Play sound