जळगाव, प्रतिनिधी । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) ला भाजपा केवळ निवडणुकांसाठी जवळ करतो, त्यानंतर आरपीआयची साधी दखल देखील घेत नसल्याची खंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )अनिल अडकमोल यांनी व्यक्त केली.
श्री. अडकमोल यांनी पुढे सांगिलते की, भाजपच्या दुटप्पी धोरणाबाबत राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देखील कळविण्यात आले आहे. महापालिकेत भाजप कोट्यातून रिपब्लिकन पक्षाला स्वीकृत नगरसेवक पद दिले पाहिजे. आम्ही याची मागणी करण्यापूर्वी भाजपने ते आम्हाला दिले पाहिजे होते अशी रास्त मागणी असल्याचे श्री. अडकमोल यांनी स्पष्ट केले. दलित समाजाचा समतोल राखण्यासाठी एक स्वीकृत नगरसेवक दिले पाहिजे अशी मागणी असणार असून यासंदर्भात आरपीआय (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे यांची शिष्टमंडळ भेट घेऊन कमीतकमी ६ महिने स्वीकृत नगरसेवकपदी आम्हाला संधी द्यावी अशी मागणी करणार आहेत. २०१८ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पळतीचा काळ होता, शिवसेना सोडून लोक भाजपात जात होते तेव्हा आम्ही सुरेश दादा जैन यांना पाठींबा दिला आहे. यात ७५ च्या ७५ नगरसेवकांसाठी आरपीआय ने प्रचार केला आहे. त्यावेळेस सुरेश दादा जैन यांना आरपी आय ला स्वीकृत नगरसेवक देण्याबाबत आश्वासन दिले होते. दुर्दैवाने त्यावेळी शिवसेनेचे केवळ १५ सदस्य निवडून आले होते. मात्र, आता शिवसेनेची सत्ता महापालिकेवर आलेली असून आरपीआय ला शिवसेनेने किंवा भाजपने स्वीकृत सदस्य पदाची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
नियम पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची परवानगी द्या
आगामी १४ तारखेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जिल्ह्यात या दिवशी भीम सैनिक मोठ्या प्रमाणावर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. अशा भीम सैनिकांना सोशल डिस्टन्सिंग. सॅनीटायझर चा वापर करून अभिवादन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी श्री. अडकमोल यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्री. अडकमोल यांनी दिली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/439879473753802