यावल, प्रतिनिधी । आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सातत्याने तालुक्यात वाढत्पा रुग्णसंख्येची दखल घेत आज यावल ग्रामीण रुग्णालयात येथे आकस्मिक भेट देऊन कोरोना उपचारांचा संदर्भातील संपुर्ण आढावा घेतला.
आ. शिरीष चौधरी यांनी यावल रुग्णालयाला आकस्मिक भेट देवून वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रितम तायडे यांच्याशी केली चर्चा करून आरोग्या संदर्भातील नियोजनाचा तपशिलवार माहीती घेतली. तसेच कोरोनाच्या वाढत्पा प्रादुर्भावासाठी आरोग्य यंत्रणेला अधिक सर्तक राहण्याच्या सुचना दिल्यात. यावेळी त्यांच्या सोबत जळगाव जिल्हा परिषदचे गटनेते व कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी दुसरा डोस वैकसिन साठी उपलब्धतेनुसार बाबतची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दुरध्वनी करुन नागरीकांसाठी ती उपलब्ध करून द्यावी अशी चर्चा केली . वेळी उपस्थित नानासाहेब घोडके, शहरध्यक्ष कदीर खान, अनिल जंजाळे, विक्की गजरे, अश्फाक शाह यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे संपुर्ण आरोग्य कर्मचारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/264909055344926